Share

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देण्यासह शासन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या 13 विकास योजनांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले. धनगर समाजाच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

सन 2020-21 या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला 51 कोटी रुपये निधी कोविडचे निर्बंध असताना देखील काही प्रमाणात वितरित करण्यात आलेला असून, येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री भाई जगताप, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, कपिल पाटील, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!