Share

घरफोडी करण्याच्या उद्देशाने छतावर लपून बसला आरोपी; नंतर घडले असे काही

Published On: 

जालना : घरफोडी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी घराच्या पत्रावर लपून बसलेल्या आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जालन्यातील डांबरी येथे गुरुवारी रात्री ही घडली. बबन दौलत उमप असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

जालन्यात गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या घटना थांबवण्याचे मोठे आव्हन पोलिसांसमोर आहे. अशातच डांबरी येथे एका घराच्या छतावर कुणीतरी बसल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ गावात जाऊन छतावर बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हा आरोपी चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने छतावर लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मौजपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक बरडे हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!