Share

विराटसोबतच्या वादानंतर स्टोक्सने मांडली आपली भूमिका

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीच इंग्लंडचा डाव अवघ्या २०५ धावांवर गुंडाळला. दरम्यान, या कसोटी सामन्यात देखील भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये गरमा-गरमी सुरु असल्याचं दिसून आलं.

मैदानात बेन स्टोक्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकमेकांना भिडले होते. हा वाद एवढा वाढला की अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली होती. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना कर्नाटक विराट कोहली आणि बेन स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळली. याची सुरुवात मोहम्मद सिराजच्या एका बाऊन्सर चेंडू पासून झाली होती. यानंतर, स्टोक्स आणि कोहली मैदानातच एकमेकाला भिडले. अखेर दोन्ही पंचांना मध्यस्थी करुन वाद आटोक्यात आणावा लागला.

शाब्दिक वादानंतर स्टोक्सने प्रतिक्रिया दिली आहे. स्टोक्स म्हणाला, “आजकाल क्रिकेट खेळत असलेल्या दोन संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची होणे साधारण होणे. परंतु ही साधारण घटना फार लवकर चर्चेचा विषय ठरते आणि याला वेगवेगळे रंग चढवण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. परंतु कोणाला कमी लेखण्याची आमची अजिबात इच्छा नाही. प्रतिस्पर्धी संघांचे खेळाडू सहज बोलत जरी असतील, तरी असे वाटते की आम्ही काही चुकीचे केले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!