Share

आयपीएल सामने मुंबईत व्हावेत ; बीसीसीआय सीईओसह असोसिएशनच्या सदस्यांनी घेतली पवारांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली.

आयपीएल लिलावानंत खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांसह ही आयपीएल खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन हे भारतात केलं जाणार आहे. दरम्यान आयपीएलचा थरार हा भारतातील 6 राज्यात रंगणार आहे.  याआधी फक्त 5 शहरांची नावं निश्चित होती. तर मुंबईबाबत निर्णय झाला नव्हता.

आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी बुधवारी BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील सामन्यांचे मुंबईत आयोजन करण्यात परवानगी मिळावी, यासाठी ही भेट घेण्यात आली होती. त्या बैठकीत पवारांनी आयपीएल प्रतिनिधींना महाराष्ट्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत मिळेल, असे आश्वासन दिले.

आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी आहे आणि BCCIनं अजूनही वेळापत्रक जाहीर केलेले नाही. बीसीसीआयनं यापूर्वी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची आयपीएल सामन्यांसाठी निवड केली होती. राज्य सरकारच्या परवानगीनंतर मुंबईबद्दल अंतिम निर्णय होईल, असेही त्यावेळी बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते.

महाराष्ट्र व मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. अशात मुंबईत आयपीएल सामने होणार नसल्याची शक्यता कमी होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय व आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त cricbuzz ने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!