Share

रेल्वे विद्युतीकरणाचा असाही परिणाम; दोन रेल्वे गाड्या झाल्या रद्द

Published On: 

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेमध्ये विद्युतीकरणाच्या कामामुळे बऱ्याच गाड्यावर परिणाम होणार आहे. याचा परिणाम म्हणून नांदेड रेल्वे विभागातील दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या. तर विद्युतीकरणामुळे एका रेल्वेचा मार्ग बदलण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील गुंटकल विभाग व तिरुपती रेल्वेस्थानकावरील दक्षिणकडच्या भागात ही विद्युतीकरणाची कामे केली जाणार आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील दक्षिण मध्य रेल्वे मध्ये तिरुपती रेल्वे स्थानकावर दक्षिण बाजुच्या भागात यार्ड अरेंजमेन्ट्स आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी नॉन इंटरलॉक वाकिंग करण्यात येणार आहे. यामुळे गाडी क्रमांक ०२७६५ तिरुपती-अमरावती द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस ६ मार्च आणि ९ मार्चला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे आणि गाडी क्रमांक ०२७६५ अमरावती ते तिरुपती द्वी साप्ताहिक एक्स्प्रेस ८ आणि ११ मार्चला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.

तर गाडी क्रमांक ०६७३३ रामेश्वरम ते ओखा ही साप्ताहिक एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. ५ मार्च रोजी ही एक्स्प्रेस तिचा नियमित मार्ग असलेल्या काटपाडी-तिरुपती-रेणीगुंठा या मार्गाने न धावणार नाही. ही एक्स्प्रेस काटपाडी- मेल्पाक्कम- रेणीगुंठा या मार्गाने धावेल. म्हणजे ही एक्स्प्रेस रेणीगुंठाच्या पुढे ओखापर्यंत ती आपल्या नियमित मार्गानेच धावेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जनसंपर्क विभागाने कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!