मुंबई: देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात होणार आहे. या टप्प्यात ६० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच ४५ वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
एक मार्चपासून देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला.
दरम्यान भारतात तसेच जगभरात लस घेतल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांसह अभिनेते- अभिनेत्री सोशलवर फोटो शेअर करून लसीकरणाचं स्वागत, समर्थन करत आहे.यातच अमेरिकेतील 75 वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड गायिकेने सुद्धा डॉली पार्टनने अनोख्या अंदाजात लस घेतली आहे. लस घेतांनाचा तिने एक व्हिडियो सोशलवर शेअर केला आहे. तिनं आपल्या अतिशय लोकप्रिय ‘जोलीन’ गाण्याचं कोविड व्हर्जन गुणगुणतच लस घेतली.
Dolly gets a dose of her own medicine. @VUMChealth pic.twitter.com/38kJrDzLqC
— Dolly Parton (@DollyParton) March 2, 2021
‘Vaccine,Vaccine,Vaccine, Vaccine, I’m begging of you please don’t hesitate. Vaccine, vaccine, vaccine, vaccine, because once you’re dead, then that’s a bit too late.’ असं गुणगुणत तिनं आपल्या चाहत्यांनाही तिनं लस घेण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

