नाशिक : ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आता हीच योग्य वेळ आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची.
राज्य सरकारकडे दिले जाणारे धोरण हे केंद्राकडे आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. या संदर्भात बोलताना राज्य सरकारवर सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.