🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर आणि आयपीएलमधील पंजाब किंग्जचा स्टार खेळाडू शिखर धवन सोशल मीडियावर कायम सक्रिय आसतो. तो अनेकदा त्याच्या सहकारी खेळाडूंसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या या मजेदार व्हिडिओंवर चाहतेही त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतात. धवनने अलीकडेच त्याचा मुलगा जोरावरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. धवनने या फोटोसोबत भावनिक कॅप्शनही लिहिले आहे.
शिखर धवनने अलीकडेच त्याचा मुलगा जोरावरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. धवनने या फोटोसोबत भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये धवनने लिहिले की, ‘तुला पुन्हा पाहून खूप आनंद झाला.’ धवनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स धवनच्या मुलाला ज्युनियर गब्बर म्हणत आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्स या फोटोचे कौतुकही करत आहेत.
https://www.instagram.com/p/CeYS3MZu7SM/?igshid=YmMyMTA2M2Y=
आयपीएल २०२२ मधील कामगिरी
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने शिखर धवनला ८ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केले होते. याआधी धवन दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, पण त्याच्या खराब कामगिरीमुळे दिल्ली संघाने त्याला सोडले होते. आयपीएल २०२२ च्या १४ सामन्यांमध्ये धवनने ३८.३३ च्या सरासरीने आणि १२२.६६ च्या स्ट्राइक रेटने ४६० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकेही झळकावली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
