🕒 1 min read
परभणी : जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास किसनराव चौधरी यांना ग्रामविकास विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल औरंगाबाद विभागाचा राज्य सरकारकडून गुणवंत अधिकारी म्हणून ग्रामविकास मंत्रालयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामीण विकास विभागाअंतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबवले जातात. अशा काही योजना व प्रकल्प राबवताना संबंधित अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना शासकीय अधिकारी – कर्मचार्यांमध्ये विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. अशा अधिकारी – कर्मचार्यांचा गौरव करण्याची योजना ही ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 2005 पासून सुरू केली आहे.
शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातील क्षेत्रीय स्तरावरील व मंत्रालयातील गुणवंत अधिकारी कर्मचार्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्याचा निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने घेतला आहे. तर 2019 – 20 यावर्षाकरिता 43 गुणवंत अधिकारी कर्मचार्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यात औरंगाबाद विभागाअंतर्गत पभणी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास चौधरी यांना गुणवंत अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर केला. विभागाचे उपसचिव पी. के. जाधव यांनी यासंबंधीचे पत्र बुधवारी जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


