मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. मात्र, आता काही प्रमाण स्थिती आटोक्यात आल्याने हळू-हळू सर्वकाही पूर्वी प्रमाणे सुरळीत होत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लोकप्रिय बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज हे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करावे यासाठी बैलगाडा प्रेमींचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse-Patil) यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’ही अत्यंत आनंदाची बाब आहे कारण गेले अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यती सुरु होत्या. परंतु काही कारणामुळे या शर्यती बंद करण्यात आल्या होत्या. जवळपास १० वर्षे या शर्यती बंद होत्या. तेव्हापासून या शर्यती पुन्हा एकदा सुरु व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो आणि आता या शर्यती सुरु झाल्या आहेत.’
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. आता राज्यातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होईल. परंतु या शर्यती राज्य सरकारने अधोरेखित केलेल्या नियम व शर्तींचे योग्य पालन करून आयोजित कराव्यात ही सर्वांना विनंती.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) December 16, 2021
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. आता राज्यातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होईल. परंतु या शर्यती राज्य सरकारने अधोरेखित केलेल्या नियम व शर्तींचे योग्य पालन करून आयोजित कराव्यात ही सर्वांना विनंती, असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले- जितेंद्र आव्हाड
- जैसी करनी वैसी भरनी! कोहलीच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांना झाली अनिल कुंबळेची आठवण
- कोहलीच्या गौप्यस्फोटानंतर सलमान बट्टने साधला सौरव गांगुलीवर निशाण
- ‘खंडणी सरकार कोणाला पाठीशी घालण्यासाठी न्यायालयात सारखे तोंडघशी पडत आहे?’
- ‘चिअर गर्ल्स संस्कृती आणणारे दुसरं काय करणार?’, नीलेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


