लातूर: राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची खरी संख्या लपवत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण दररोजच्या आकड्यांच्या तुलनेत पाच-सहापट असून सरकार, प्रशासन अपयश झाकण्यासाठी खरी माहिती समोर येऊ देत नाही. या प्रकरणाचा आपण १ जून रोजी सर्व पुराव्यानिशी भंडाफोड करू, असा गर्भित इशारा माजी पालकमंत्री आ. संभाजीराव निलंगेकर यांनी दिला आहे.
कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात बळी जात आहे. सरकार व प्रशासनाने दुसरी लाट गांभीर्याने घेतली नाही. राज्य सरकारने देवाच्या भरवशावर कोरोना महामारी थोपविण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत चुकीचे झाले. कोरोनातून आपला लातूर जिल्हा तसेच राज्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करतोय. आम्ही कोणत्याच बाबीला विरोध करीत नाही. याचा अर्थ आम्हाला काही माहिती नाही, असा होत नाही. सर्व माहिती आहे. कोरोना विषाणूचा हल्ला रोखण्यात राज्य सरकार, प्रशासनाला सपशेल अपयश आले, असा आरोप माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केला.
तसेच स्थानिक प्रशासन खरी आकडेवारी देत नाही. कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू पावलेल्यांचे आकडे चुकीचे दिले जातात. दररोज जाहीर केल्या जाणाऱ्या आकड्यांच्या तुलनेत पाच-सहा पट अधिक मृत्यू होत आहेत, हे सत्य असून खरी माहिती कशामुळे समोर येऊ दिली जात नाही, हे कळायला मार्ग नाही. मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असून, जानेवारी ते मे दरम्यान, किती मृत्यू झाले, याची खरी माहिती दिली पाहिजे. या कोरोना महामारीत जे काही चुकीची आकडेवारी दिली जात आहे, त्याची खरी माहिती आपण पुराव्यानिशी जाहीर सांगणार आहोत. कागदोपत्री माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. १ जून २०२१ पर्यंत सर्व माहिती हाती येईल. तेव्हा आपण तुम्हाला सर्व पुराव्यांसह माहिती देऊ, असे आ. निलंगेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- नवा पक्ष काढण्याची कार्यकर्त्यांची मागणी, तर फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले…
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?’
- सकारात्मक! लातुरात कोरोना रुग्ण संख्या होतीये कमी
- मुंबई महापालिकेची निवडणूक होणार ? निवडणूक आयोगासोबत अधिकाऱ्यांची बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

