Share

सकारात्मक! लातुरात कोरोना रुग्ण संख्या होतीये कमी

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

लातूर जिल्ह्यात गुरूवार १९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निष्पन्न झाले. कोरोना विषाणूची लागण झालेले २२ रूग्ण दगावले. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा खाली येत असून, ही दिलासा देणारी बाब असली तरी मृत्यूचा आकडा आणखी खाली येण्याची गरज आहे. आरटीपीसीआर टेस्टमध्ये १०५ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ८८ असे मिळून १९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले.

गुरूवारी आरटीपीसीआर एकूण टेस्ट ११२३ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट १९२४ झाल्या. एवढ्या टेस्टमधून १९३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ८८ हजार ३१६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असले तरी यातील उपचाराने ८३ हजार १६६ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या होम आयसोलेशनमध्ये १८९५ रूग्ण असून, प्रत्यक्ष रूग्णालयात १२०१ रूग्ण उपचार घेत आहेत. आज ४९३ रूग्ण दुरूस्त होऊन घरी गेले आहेत. आज २२ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात आजवर २०५४ रूग्ण मृत्यू पावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!