नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये देखील देशातील राजकारण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या या परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना समजलाच नाही असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
‘सरकारला कोरोना संदर्भात अनेकदा सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागेच म्हटलं होतं, जागा बंद करा. कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा’ असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
LIVE: My interaction with members of the Press about GOI’s Covid vaccine disaster. https://t.co/YbC8iSe4aw
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2021
केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना हा केवळ आजार नसून तो बदलणारा आजार आहे. या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेची निवडणूक होणार ? निवडणूक आयोगासोबत अधिकाऱ्यांची बैठक
- अंबाजोगाई येथील धक्कादायक प्रकार! कोविड केअर सेंटरमध्ये ‘ब्रदर’नेच केला नर्सचा विनयभंग
- पदोन्नतीतील आरक्षणासाठी रामदास आठवले करणार राज्यभर आंदोलन
- ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये ‘या’ कारणामुळे दिसणार नाही अभिनेत्री उषा नाडकर्णी
- मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड, धोनीचा नवा पत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

