मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून आज (२८ मे) रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहेत.
तर मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे हे सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी देखील घेत आहेत. काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे.
संभाजीराजे यांनी नेत्यांच्या भेटींचा धडाका लावला असून दुसऱ्याबाजूला त्यांच्या समर्थकांनी सोशल माध्यमांमध्ये संभाजीराजेंनी नवा पक्ष काढावा अशी मागणी करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. यामुळे राजकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. हा समाज दु:खी आहे. त्याला आता न्याय मिळाला नाही, तर जे काही होईल त्याला माझ्यासकट सर्व नेते मंडळी जबाबदार असतील. त्यामुळे या बाबतीत तुझं माझं न करता सर्वांनी एकत्र यावं,’ असं आवाहन मी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.’
महत्वाच्या बातम्या
- अकरावीचे प्रवेश कसे होणार ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- अंबाजोगाई येथील धक्कादायक प्रकार! कोविड केअर सेंटरमध्ये ‘ब्रदर’नेच केला नर्सचा विनयभंग
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?’
- ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये ‘या’ कारणामुळे दिसणार नाही अभिनेत्री उषा नाडकर्णी
- मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड, धोनीचा नवा पत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

