Share

मुंबई महापालिकेची निवडणूक होणार ? निवडणूक आयोगासोबत अधिकाऱ्यांची बैठक

Published On: 

मुंबई : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. दुसरीकडे देशात मागील काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. त्यामुळे देशात संसर्गाचा धोका वाढला आहे.

आता बहुप्रतीक्षित आणि शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बीएमसी निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर होणार की कोरोनामुळे तिला मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार याची उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस मदान यांची मुंबई महापालिकेच्या आधिकाऱ्यांसोबत आज बैठक होत आहे.

मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

मुंबईतील कोरोना संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असला, तरी तिसरी लाट येण्याचा इशाराही तज्ज्ञांकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक होणार की मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस मदान यांची महापालिकेच्या आधिकाऱ्यांसोबत आज बैठक होणार असून बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात होणारी गर्दी पाहता देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. तेव्हापासून निवडणूक आयोगावर टीका होत आहे. त्यामुळे आता निवडणुकीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोग जबाबदारीने पाऊले उचलेले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!