Share

श्रीलंका दौरा हा द्रविड आणि बीसीसीआयसाठी सारखाच महत्वाचा- लक्ष्मण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकाच वेळी भारताचे दोन क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. प्रमुख खेळाडूचा संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तर इतर राखीव आणि युवा खेळाडूचा संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद हे राहुल द्रविडकडे सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघात जरी प्रमुख खेळाडूंचा समावेश नसला तरीही या दौऱ्यावरील खेळाडु श्रीलंकेला सहज नमवतील. या दौऱ्यावर भाष्य करताना भारताचा माजी क्रिकेटपटु व्ही व्ही एस लक्ष्मणने एक मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की,’राहुल साठी त्यामुळे हा दौरा खुप महत्वाचा आहे. कारण या दौऱ्यात त्याने जर युवा खेळाडूंची फौज तयार केली तर भविष्यात भारतीय संघाचे पुर्णवेळ प्रशिक्षक पद त्याच्याकडे येऊ शकते.’

तसेच पुढे बोलताना लक्ष्मण म्हणाला की, ‘श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविडला भारतीय संघातील युवा खेळाडूंना तयार करण्याची संधी आहे. युवा खेळाडूच्या प्रतिभेला ओळखुन त्यांना घडवण्याचे काम राहुलने यापुर्वी केले आहे. त्यामुळे हा दौरा बीसीसीआयसाठीही तितकाच महत्वाचा आहे.’ आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत युवा खेळाडू भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावु शकतात. या अनुषंगाने लक्ष्मणने हे वक्तव्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!