Share

कोरोना नियमाचे पालन करत वडोदचा आठवडी बाजार भरणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अनेक दिवसांपासून कोरोना परिस्थितीत संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून बंद असलेला वडोदबाजार येथील जनावरांचा आठवडी बाजार आता सोमवारी दि.५ भरणार असून यासाठी व्यापा-यांना अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

वडोदबाजार जिल्ह्यातील जनावरांसाठीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथे मेंढी, बकरी, गाय, म्हशींची मोठ्या प्रमाणावर सोमवारी खरेदी-विक्री केली जाते. यूपी, मध्य प्रदेश, सातारा, सांगली, मुंबई, पुणे, आंध्र, कर्नाटक आदी भागांसह मराठवाड्याच्या बीड, जालना, नांदेड, परभणीसह खान्देशामधून खरेदी-विक्री करणारे व्यापारी येथे कोटीची उलाढाल करतात. सोमवारी कपडा मार्केट, मोबाइल शॉपी, हॉटेल, सराफा बाजार, धान्य मार्केट, भाजीपाला आदी दुकानांवर हजारोंची उलाढाल होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिका-यांनी अंशत: लॉकडाऊनचा आदेश जारी केला. याची दखल घेत व्यापा-यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शनिवार-रविवारनंतर लागूनच सोमवारचा आठवडी बाजार आल्याने तोसुद्धा बंद ठेवण्यात आला होता.

मात्र, जीवनावश्यक असलेली दुकाने वगळता सोमवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आल्याने अंदाजे कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला होता. आता नुकतीच थोडी सूट मिळून आठवडी बाजार सुरू झाल्याने व्यापारी, शेतकरी यांच्यासह छोट्याा-मोठ्या उद्योग-व्यवाहरांना थोडा दिलासा मिळणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बाजार भरवला जाणार आहे, असे ग्रामपंचायतीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!