औरंगाबाद : देउळगाव बाजार येथे कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सिून येत असून यामुळे शेतक-यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पंचायत समितीचे कृषि अधिकारी संतोष भालेराव यांनी येथील शेतकरी पुंजाराम विठ्ठलराव गरूड यांच्या शेतातील मिरचीसह परिसरातील मिरची पिकाची पाहणी केली असता मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्याने यावेळी उपस्थित शेतक-यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
फुलकिडे हे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस राहतात व पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला वळतात यालाच आपण बोकड्या किंवा चुरडामुरडा म्हणतो. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एस.एल.५ मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के एस.सी.१५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करताना ०.१ टक्के चिकट द्रव्याचा वापर जरूर करावा.
भूरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्राम किंवा कॅप्टन व हेक्झाकोनॅझोल १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारण्या दर पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात, असे यावेळी शेतक-यांना सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

