औरंगाबाद : रत्नपूर तालुक्यातील शिक्षकांना मुख्यालयी रहाणे सक्तीचे करण्यात येऊ नये या बाबतीत आ.प्रशांत बंब यांना शिक्षक सेनेच्या वतिने निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी आ.प्रशांत बंब यांनी आपल्या शिक्षकांनी गुणवत्ता द्या, शाळेचा विकास दाखवा, काही शिक्षक चांगले काम करतात परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत गरिबांचे विद्यार्थी शिकत असल्याने त्यांच्या कल्याणासाठी चांगले काम करण्याचे आश्वासन द्या, आपला मुख्यालयी रहाण्याचा मुद्दा कायमचा निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन आ.प्रशांत बंब यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळास दिले.
यावेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष तथा गंगापूर शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुनिल जाधव, जिल्हा संघटक तिलकेश्वर सिरसाठ, तालुकाध्यक्ष जे.के.राऊत, सरचिटणीस अंकुश रावते, उपाध्यक्ष हंसराज काळे, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष गवळी यांच्यासह न.प.चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
