औरंगाबाद : सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे सहा नवीन दुचाकी वाहने मिळाल्याने पोलीस बांधवांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पोलीस तपासाला आणि घटनास्थळी पोहण्यासाठी वेग येणार असल्याची आशा पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे शनिवार दि.(३) रोजी पोलीस स्टेशनला मिळालेल्या नवीन सहा दुचकी वाहनांच्या चाव्यांचे वाटप उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भवन, अंधारी, बोरगांव, आमठाणा, भराडी व पालोद या सहा बीट मध्ये नवीन दुचाकी वाहनांचे वाटप यावेळी करण्यात आले. या वाहनांचे पुजन महिला पोलिस भगींनींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार मराठे, सह.निरीक्षक प्रल्हाद मुंढे, उपनिरीक्षक विकास आडे, पंडित इंगळे, सा.फौजदार नामदेव सपकाळ, सचिन सोनार, दिपक इंगळे, अनिल ठाकुर, संदिप कोथलकर, दादासाहेब पवार, महिला पोलिस गिता ढाकणे, वैशाली डगळे, तेजस्विनी सुरोसे, शेख हमीद व आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
