🕒 1 min read
नवी दिल्ली- भारतात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात असून आता या मोहिमेला आणखी बळ मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ या लसीचेही उत्पादन करणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही मंजुरी दिली आहे.
पुण्यातील हडपसर केंद्रात स्पुटनिक व्ही लस निर्मितीसाठी मॉस्कोच्या गमलेया सिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ अपिडेमियॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसोबत करार केला आहे. भारतात सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजद्वारे स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन केलं जात आहे. स्पुटनिक व्ही लसीला आतापर्यंत ५०हून अधिक देशात मान्यता आहे.
भारतात स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, लशीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने एप्रिलमध्ये परवानगी दिली होती. रशियाने तयार केलेल्या स्पुटनिक लशीची 30 लाख डोसची एक खेप भारतात मंगळवारी भारतात पोहोचली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी खेप आहे. स्पुटनिक व्ही लशीचा साठा शून्य ते 20 अंश सेल्सियस डीग्रीपेक्षा कमी तापमान लागते. भारतात रेड्डी लॅबला स्पुटनिक व्ही लशीच्या आपत्कालीन वापराला आधीच मंजुरी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
