Share

‘विकासाचे धोरण नसल्याने संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात’

Published On: 

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात युवकांच्या संघटनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

नागरिकांनी नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. सत्ताधाऱ्यांकडे विकासाचे मुद्दे व धोरण नसल्याने, मंत्री काहीही बोलत नाहीत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री पुण्यात आणि मुख्यमंत्री मुंबईत बसतात. प्रशासनावर सरकारची पकड राहिली नसून महाराष्ट्र पंचवीस वर्ष मागे गेला आहे. तरीही राज्यात सर्व काही अलबेल सुरू असल्याचे भासविले जाते आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेले. मात्र आरक्षणासंदर्भात ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे नुकसान झाले असून, कुठलीही मदत तेथील लोकांपर्यंत पोहचू शकली नाही. तर उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यावर एकही मंत्री बोलायला तयार नाही

कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही
भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये ६० टक्के मंत्री हे ओबीसी होते. आज महाविकास आघाडी सरकार आणि फडणवीस सरकारची तुलना करा. फरक सर्वांच्या लक्षात येईल. एकनाथ खडसे यांनाही पक्षाने खूप काही दिले. मी स्वतः तसेच पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबतीत एखादा विषय झाला असेल, काही घटना घडली असेल तर लगेचच पक्ष चुकीचा ठरत नाही. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेल्याने पक्षाचे काही एक नुकसान झालेले नाही. खडसेच काय तर कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही असे बावनकुळे जळगाव येथे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!