🕒 1 min read
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडमधील दुर्घटनाग्रस्त तळीये (ता.महाड) गावाला भेट देणार आहेत. मुंबईतून हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीला जाणार आहेत. तिथून मुख्यमंत्री मोटारीने तळीयेला पोहोचणार आहे. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.३० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतील, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दुर्घटना घडून २४ तास झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे तळीये गावाला भेट देणार आहेत. तसेच केवळ दोन तासात ते आपला दौरा आटोपणार आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘हा झटपट दौरा दु:ख पुसायला आहे की कडे निखळलेला डोंगर पाहायला?’ असा सवाल भाजपने विचारलाय.
सब से तेज…
लोकलज्जेमुळे मुख्यमंत्री @OfficeofUT तळीये गावाला भेट देणार आहेत. दुपारी १२ला हेलिकॉप्टरने निघून दीडला गावात पोहोचून सव्वातीनला मुंबईला परत! हा झटपट दौरा दरडग्रस्तांचे दु:ख पुसायला आहे, की कडे निखळलेला डोंगर पाहायला-लाँग ड्राइव्हसाठी आखलाय?#MaharashtraFloods pic.twitter.com/QisIMgji0J— BJP Mumbai (@BJP4Mumbai) July 24, 2021
सब से तेज…लोकलज्जेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाला भेट देणार आहेत. दुपारी १२ ला हेलिकॉप्टरने निघून दीडला गावात पोहोचून सव्वातीनला मुंबईला परत! हा झटपट दौरा दरडग्रस्तांचे दु:ख पुसायला आहे, की कडे निखळलेला डोंगर पाहायला-लाँग ड्राइव्हसाठी आखलाय? असे ट्विट भाजप मुंबईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेय.
मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून टीका
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून आणि पुरामुळे जनजीवन विस्तळीत झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळांवर जात नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘नैसर्गिक अपत्तीच्या काळात राजकारण नको, हातात हात घालू काम केले पाहिजे, हे मान्य आहे. आम्ही त्यासाठी हात द्यायला तयार आहोत, पण सरकारचा हात तर दिसू द्या. सध्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री ठाकरे घरात बसून आहेत. त्यांचे मंत्रीही कोठे मदतीला धावले दिसत नाहीत. आम्हाला मात्र राजकारण करू नका म्हणतात’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली शुक्रवारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या पत्राला बिपीन रावत यांचा प्रतिसाद, पूरग्रस्त भागात सैन्यदलाच्या तुकड्या दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी’
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला
- मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
