मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी केलेल्या मार्गदर्शक सूचना वादग्रस्त ठरल्या होत्या. आता त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.
राज्य शासनाचे सुमारे १ लाख २० हजार कर्मचारी, अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी आता भ्रमणध्वनी (मोबाइल) आचारसंहिता लागू झाली आहे. शासकीय कार्यालयात शक्यतो लँडलाइनचा वापर करावा, गरज भासली तरच मोबाइलचा वापर करावा, मोबाइलवर सौजन्यपूर्वक बोलावे, वाद घालू नये यासह 9 महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
फोन वापराबाबत महत्त्वाच्या सूचना कोणत्या
कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनी म्हणजे लँडलाईनचा वापर करावा.
कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.
भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.
कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना टेक्स मेसेजचा शक्यतो वापर करावा.
तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- ‘हा झटपट दौरा दु:ख पुसायला आहे की कडे निखळलेला डोंगर पाहायला?’
- संभाजीराजेंच्या पत्राला बिपीन रावत यांचा प्रतिसाद, पूरग्रस्त भागात सैन्यदलाच्या तुकड्या दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी’
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला


