Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्री रावसाहेब दानवे कुटुंबीयांशी संवाद

Published On: 

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत मोदी यांची सहकुटुंब घेतलेली भेट हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

गुरुवारी संसद भवन येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या समवेत आमदार संतोष पाटील दानवे, निर्मलाताई दानवे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, शुभम पांडे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पारिवारीक भेट घेतली. याबाबत संतोष दानवे यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

भेटीत रावसाहेब दानवे यांनी परिवारातील सर्व सदस्यांशी मोदी यांना ओळख करुन दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी दानवे परिवारातील सर्व सदस्यांशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन संवाद साधला. यावेळी दानवे यांच्याकडुन महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीचा आढावा घेत असतांना नव्याने मिळालेल्या रेल्वे खात्याच्या कामकाजा बद्दलही संवाद साधला. रेल्वेखाते हे केंद्रातील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे.

या खात्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम करण्यासाठी मोठया प्रमाणावर वाव असुन आपण हे खाते समर्थपणे सांभाळुन आपल्या कार्यकाळात रेल्वेच्या विकासाला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अत्यंत आनंददायी व अविरतपणे कार्य करण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या भेटीने आपण भारावलो असून हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही, असेही आ. दानवे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!