Share

औरंगाबाद मनपाच्या रस्त्यांची ‘ती’ यादी आता चंद्रकांत खैरेंकडे; पालकमंत्री म्हणतात थोडे थांबा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेने पाठवलेल्या १११ रस्त्यांची यादी नगर विकास विभागाने नाकारून पुन्हा माघारी पाठवली आहे. तर आमदारांच्या शिफारशीनुसार यादी पुन्हा पाठवण्याची सूचना मनपाला करण्यात आली आहे. मात्र आता ही यादी शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या हाताखालून जात असल्याची माहिती येत आहे. सध्या या रस्त्याची यादी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे आहे. खैरे यात काही रस्त्यांची भर घालणार असल्याचे समजते. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी सध्या तरी रस्त्याचे प्रकल्प नसल्याचे सांगत थोडे थांबण्याची सूचना केली आहे.

औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अनेक मुख्य रस्ते चकाचक असले तरी शहरातील बहुतांश भागातील खड्डे कायम आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष, नागरिकांकडून मनपाला वेळोवेळी निवेदने देखील देण्यात आलेली आहेत. मात्र शहरातील रस्ते सुधारण्यास आता आणखी विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या १११ रस्त्यांच्या यादीला राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने नाकारली आहे. मनपा निवडणुकीपूर्वीच आता राज्य शासन याबाबत निर्णय जाहीर करेल.

१११ रस्त्यांच्या प्रस्तावासोबतच दिलेल्या रस्त्यांच्या यादीत त्रुटी असल्याचे सांगत नगरविकास खात्याने ती परत पाठवली आहे. आमदारांच्या शिफारशी विचारात घेऊन रस्त्यांची यादी तयार करा आणि मंजुरीसाठी पाठवा, असे आदेश या खात्याने दिल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे यांनी पालिकेकडे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या याद्या सादर केल्या आहेत. आमदार अंबादास दानवे यांची यादी अजून येणे बाकी आहे. आमदारांच्या शिफारशीनुसार पालिका प्रशासनाने तयार केलेली रस्त्यांची यादी शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मागवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!