Share

‘…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत’, संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. आज प्रकरणात एनसीबीकडून नेमण्यात आलेले पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली असून समीर यांनी आमच्याकडून कोऱ्या पंचनाम्यावर सह्या घेतल्याचा आरोप प्रभाकरने केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाजपावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

याविषयी पत्रकारांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’या आरोपांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन करावा. मुंबईत असे प्रकार घडवले जात आहेत आणि महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. मुंबईचे पोलीस देखील अंमली पदार्थ पकडत आहेत. पण हे दोन ग्रॅम, अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम पकडतायत आणि महाराष्ट्राला बदनाम करतायत. एनसीबीचे अधिकारी, त्यांचे पंच किवा आत्ता समोर आलेल्या माहितीसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’एनसीबीच्या प्रत्येक कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण यांच्यावर कुणी बोललं, तर भाजपाला असा काही पान्हा फुटतो, जणू काही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आले आहेत.’ तसेच नवाब मलिक जे सांगत होते, त्याची चेष्टा भाजपाचे लोक करत होते. आता यात भाजपाचा काय संबंध होता का हे पाहावं लागेल. एवढे पुरावे समोर येऊनही तुम्ही कोणत्या तोंडानं बोलताय? केंद्रीय यंत्रणा मुंबई-महाराष्ट्रात येतात आणि राज्याला बदनाम करायचा प्रयत्न करतायत. यात एनसीबीची भर पडली आहे. कारवाई करण्यासाठी सगळ्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल. महाविकासआघाडी सरकार म्हणून यात कारवाई करावी लागेल. केंद्रीय तपास यंत्रणांविषयी जे पुरावे समोर येत आहेत, ते धक्कादायक आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!