Share

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : देशभरात इंधन दरवाढीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतांना बाबा रामदेव यांनी यासंदर्भात आपली भूमिका मंडळी आहे. मी त्यावेळी म्हटलं होतं की काळा पैसा परत आला तर इंधनाचे दर कमी होतील. पण सरकारला आता अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि राष्ट्रहिताचे काम करावे लागत आहे, त्यामुळे कधी तरी स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

यावेळी बोलत असतांना बाबा रामदेव म्हणाले की,’काळा पैसा परत आल्यावर पेट्रोलचे दर ३० रुपये होईल असं तुम्ही म्हणाला होता, पण आता दर वाढत आहे त्यामुळे देशात काळापैसा वाढलाय का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता बाबा रामदेव म्हणाले की, मी ज्यावेळी काळापैशांविरोधात देशभरात आंदोलन केलं होतं. त्यावेळी मी काही पर्याय ठेवले होते. कर चुकवणारे असतील किंवा काळापैसा साठवला असेल तर त्यावेळी मी म्हणालो होतो की, जो क्रुड इंधनाचा दर आहे, त्यानुसार जर इंधन विकले आणि कर कमी केला तर ३० रुपयांमध्ये पेट्रोल विकणे शक्य होते. पण आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकटं आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे. सरकार सुद्धा चालवायचे आहे, त्यामुळे कधी ना कधी तरी स्वप्न हे पूर्ण होईल,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘भारत आणि पाकिस्तान सामना उद्या होणार आहे. या परिस्थिती भारत पाकिस्तान असा सामना होणे हे देश हितासाठी योग्य नाही. क्रिकेटचा खेळ आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही’, असेही यावेळी बोलतांना बाबा रामदेव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!