🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज सापडल्या प्रकरणी आर्यन खान सह आठ जणांना एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर किरण गोसावीने त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याने त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने त्याचा एनसीबीशी कोणताही संबंध नसून एक साक्षीदार म्हणून तो सोबत होता असे स्पष्टीकरण दिले. आता या प्रकरणी खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे.
किरण गोसावी आपल्या फोनवरुन आर्यन खानचे बोलणे कुणाशीतरी करुन देताना या व्हिडीओत दिसून येत आहे. एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे तो एनसीबीच्या कार्यालयात बसून आर्यनचे फोनवर बोलणे करुन देत असल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.
#CruiseDrugs प्रकरणी खळबळ माजवणारा व्हिडीओ,
किरण गोसावीच्या फोनवरुन #AryanKhan कुणाशी बोलतोय?@narcoticsbureau @dipeshtripathi0 pic.twitter.com/ZucVHGjaEU— ABP माझा (@abpmajhatv) October 24, 2021
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढल्यामुळे किरण गोसावी हा चर्चेत आला होता. किरण गोसावी हा एनसीबीचा साक्षीदार असल्याचे स्पष्टीकरण एनसीबीने दिले होते. दोन तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी किरण गोसावीवर फसवणुकीचाही गुन्हा दाखल झाला आहे.
पालघरमधील दोन तरुणांना परदेशात नोकरी लावून देतो असे सांगून त्याने लाखो रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार केळवे सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील ड्रग्जची घटना राष्ट्रीय बातमी बनली आहे. यावरुन राजकीय नेते एकमेकांवर प्रचंड टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर एनसीबीवरच खळबजणक आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बिहारींना पोटासाठीच नव्हे शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?, कन्हैय्या कुमारचा सवाल
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…’, सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची मागणी
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या नात्यासंदर्भात अरूसा आलम यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

