Share

पंचनाम्याची अट रद्द करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या; आ.नमिता मुंदडांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

बीड : अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची अट रद्द करा व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या दोन महिन्यांत सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. परिणामी शेतजमिनीचे व शेतातील पिकांचे सोयाबीन, ऊस व खरीप हंगामातील सर्व पिकांचे बागायती पिकांचे,भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे नुकसानच नाही तर पिक वाहून गेले आहे. काही ठिकाणी जमिनी खरडून वाहून गेल्या, तसेच राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पांदन रस्ते, व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रस्ते व पुल नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाकडून अत्यंत कमी मदतीचे आकडे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी सदर मदतीचा शासन आदेश निघाला मात्र यात आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांची शासनाकडून फसवणूक करण्यात आल्याचे दिसून येत आहे. शासन आदेशामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. त्यांनाच मदत मिळेल. असे नमूद केले आहे. व पंचनामे करूनच लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही अट आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याण्यासारखा प्रकार आहे.

गेल्या आठ दिवसापासून तलाठ,मंडळ अधिकारी यांचा संप चालू असल्यामुळे अनुदानाच्या याद्या प्रलंबित राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वी शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.तरी अतिवृष्टी, ढग फुटी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधीच तोकडी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे पंचनाम्याची जाचक अट त्वरित रद्द करून शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी मदत जमा करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. व नादुरुस्त रस्ते, पुलांची कामे त्वरित करण्यात यावीत.अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!