🕒 1 min read
कोल्हापूर : देशात कोरोना लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचे हे मोठे यश असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच मोदी सरकारकडून याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या या धोरणावर आक्षेप घेत टीका केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना कोरोना लस विकत घ्यायला भाग पाडले. कोरोना लसींची किंमत वाढवली ही मोदी सरकारची अक्ष्यम चूक आहे. केंद्र सरकारने लस विकत घेऊन ती राज्यांना विकत दिली असती तरी चालले असते. लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मोदी सरकराने ही जाहिरातबाजी थांबवावी अशी टीका चव्हाण यांनी कोल्हापुरात केली.
‘जगातील प्रत्येक देशाने कोरोना लस मोफत दिली. परंतु कुठेही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांचा फोटो छापला नाही. मोफत लसीकरण ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. लसीकरणाची ही जाहिरातबाजी मोदींनी थांबवावी. अनेकांनी यावरून मोदींचा फोटो काढवा अशी मागणी केली आहे. लसीकरण हा इवेंट नाही ती एक प्रक्रिया आहे. फोटो छापायचे आदेश कुणी दिली याची चौकशी व्हावी. येथून पुढे तिसऱ्या टप्प्यातील व्हॅक्सिन करणार का? हेही मोदी सरकारने जाहीर करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


