Share

पृथ्वी शॉने उत्तम कामगिरीमागचे सांगितले रहस्य म्हणाला, मास्टर ब्लास्टरनं…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ विजय हजारे स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. पृथ्वीने या स्पर्धेत साखळी सामन्यांपासून ते बाद फेरीतील सर्व सामन्यांमध्ये आपल्या बॅटने अफलातून कामगिरी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबई विजय हजारे करंडकाच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. या अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान पृथ्वीने आपल्या या शानदार कामगिरी मागचं कारण सांगितलं आहे.

“मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात परतलो. त्यानंतर सचिन सरांना भेटलो. त्यांनी मला चेंडू शरीराजवळ खेळण्याचा सल्ला दिला. पण मी चेंडू उशिराने खेळत होतो. असं कदाचित मी आयपीएलमध्ये खेळत असल्याने होत असावं. दरम्यान मी सचिन सरांचा सल्ला ऐकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना यावर फार मेहनत घेतली. मी आतापर्यंत संपूर्ण क्रिकेट बॅट शरीराजवळ न ठेवता खेळलो आहे.

पण मला हीच सवय बदलायची होती. हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होतं. पण मी यावर फार मेहनत घेतली. सचिन सरांचा सल्ला ऐकला. त्याचा मला फायदा झाला”, असं पृथ्वीने स्पष्ट केलं. पृथ्वीने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता.

“दरम्यान मी ही सवय बदलण्यासाठी नेट्समध्ये खूप मेहनत घेतली. यावेळेस टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी मला माझी चूक लक्षात आणून दिली. ती चूक मी दुरुस्त केली”, असंही पृथ्वीने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!