मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी Co-win वेबसाईट अथवा Arogyasetu या सरकारी ऍपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीची सुरुवात उद्या २८ एप्रिल पासून होणार असून राज्यातील लसीकरणाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण सुरु असतानाच लसींचा तुटवडा भासत आहे.
४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देणं गरजेचं आहे. दरम्यान, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण लसच मिळत नसेल तर लसीकरण कसे करणार?’ असा सवाल टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. त्यामुळे केंद्राने घोषणा जरी केली असली तरी लसींचा साठा उपलब्ध न झाल्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचा नंबर द्या आम्ही त्यांना पार्टीसाठी आमंत्रित करू’ ; पुणे पोलिसांचे भन्नाट ट्वीट
- अजितदादांनी केली मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही ; उद्या होणार निर्णय
- गोकुळची निवडणूक होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा महाडिकांना दणका
- केकेआरच्या ‘कोड वर्ड’ रणनीतीवर उठत आहेत प्रश्न ; मॉर्गनवर चिडला सेहवाग म्हणाला…
- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

