Share

मोफत लसीकरणावर इतरांनी बोलणं टाळलेलं बरं; अजितदादांची मविआ नेत्यांनाच तंबी

Published On: 

मुंबई : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. मात्र नंतर काही वेळात जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे यांच्यावर हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली होती. काँग्रेस देखील मोफत लसीकरणाचो मागणी करत आहे. मात्र, याबाबत कोणत्या नेत्याने नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच अधिकृत घोषणा केली पाहिजे, असं म्हणत काँग्रेस नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका भाजपने केली होती. आता या श्रेयवादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत विरोधकांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनाच त्यांनी तंबी दिली आहे. ‘राज्यात कोरोना लसीकरणावर महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील, राज्याचा आर्थिक भार या सगळ्यावर आहे, त्यामुळे इतरांनी बोलणं टाळलेलं बरं’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

यासोबतच, ‘देशातल्या जनतेचं लसीकरण करण्याचं काम केंद्राने केले पाहिजे पण अद्याप लसीकरणावर केंद्राची भूमिका स्पष्ट नाही,’ असं भाष्य करत पवारांनी केंद्र सरकारला देखील लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!