🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर झाला असल्याने परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान, मूळचे कागल(कोल्हापूरचे) असलेले ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये मुश्रीफांचं नगरकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची टीका भाजपने केली होती.
‘राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत की नाही हे उद्धव ठाकरेंनी तपासून पहाव, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तिकडे ३६०० मतदार असलेल्या गोकुळच्या निवडणूकीत बोंबलत बसलेत. एका एका दिवसात ३०-३५ लोक नगरमध्ये मृत्यूमुखी पडत आहेत. मनसेने तिथे पालकमंत्री शोधून द्या ५००० हजार रुपये मिळवा असे आंदोलन देखील केले. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छडी घेऊन पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे त्या जिल्ह्यातून हलायचं नाही’ असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा,’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकीय सुडबुद्धिने अनिल देशमुखांच्या घरावर धाड, मंत्री विश्वजीत कदमांचा आरोप
- ‘कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही’, मंत्री जयंत पाटील यांचा निर्धार
- गोकुळची निवडणूक होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा महाडिकांना दणका
- राज्यात १ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणात अडथळा ? राजेश टोपेंच महत्वाचं भाष्य
- मोफत लसीकरणावर इतरांनी बोलणं टाळलेलं बरं; अजितदादांची मविआ नेत्यांनाच तंबी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
