Share

मनपा आयुक्तांनी घेतला लसीकरणाचा दुसरा डोस

Published On: 

औरंगाबाद : महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात घेतला. ११ फेब्रुवारी रोजी आयुक्तांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे कोणीही मनात भिती न बाळगता लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यामध्ये कोविड -१९ लसीकरणाबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस उपायुक्त, झोन-२ (शहर औरंगाबाद) यांनी ११ फेब्रुवारी रोजी चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. लसीचा एक डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानुसार आयुक्तांनी आज दुसरा डोस घेतला आहे. मात्र इतर अधिकारी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

लस घेतल्यानंतर मनपा आयुक्त अर्धा तास ऑबझर्व्हेशन मध्ये होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास यावेळी झाला नाही. जिल्हा लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. जनतेमध्ये या मोहिमेबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी अधिकारी वर्ग लसीकरण करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!