लखनौ : भारतीय किक्रेटपटू मिताली राज हिने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. वनडे क्रिकेट मधील सर्वोकृष्ट खेळाडू असलेल्या मितालीने तिच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत नवीन उंची गाठली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये तिसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहेत.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघासाठी आजचा दिवस खास ठरला आहे. संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक कामगिरी केली आहे.
Legend Alert ????
Mithali Raj completes 10k international runs ????https://t.co/Qg236P6Y9M #INDWvSAW pic.twitter.com/CItdM83p6I
— Cricbuzz (@cricbuzz) March 12, 2021
मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी भारताची पहिली महिली क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. या यशासाठी बीसीसीआयने मितालीचे अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘निर्बंध लावा मात्र लॉक डाऊन नको’ पुणे व्यापारी महासंघाच अजित पवारांना पत्र
- शहरातील ‘या’ प्रसिद्ध दुकानांना, हॉटेलचालकांना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दणका
- आज मिताली आणि विराट ब्रिगेड दिसणार मैदानावर
- यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील संपन्न, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढसंकल्प करूया – अजित पवार
- विनामास्क फिरणाऱ्या युवकाकडून मनपा कर्मचाऱ्याला मारहाण


