Share

पार्सल घेतल्यानंतर ‘त्या’ महिलेने डिलीव्हरी बॉयसोबत केले ‘असे’ काही…पोलिसही चक्रावले

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरु: झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता.या व्हिडीओमुळे काही क्षणातच सोशल मिडीयावर एकच खळबळ उडाली.

या व्हिडीओ मधील महिलेने सांगितले की, झोमॅटोवरून जेवण मागवले होते. ऑर्डरला उशीर होत असल्यानं महिलेनं कंपनीच्या कस्टमर केअरवर फोन केला आणि डिलिवरी वेळेवर न मिळाल्यानं ऑर्डर रद्द केली. कस्टमर केअर बोलत असतानाच डिलिवरी बॉय घरी जेवण घेऊन आला. त्यांतर मात्र या महिलेने जेवण घेण्यास नकार दिला. याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद सुरु झाला.

नकार दिल्यानंतर देखील डिलिवरी बॉय जेवणाचा बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पीडीत महिलेने घरात शिरण्यास नकार केला. यातच डिलिवरी बॉय चिडून तुझा नोकर आहे का असे म्हणत तिच्या नाकावर एक पंच मारला आणि तेथून फरार झाला असा दावा या महिलेने केला.

https://twitter.com/HChandranee/status/1369486163140956160?s=20

या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी त्या डिलीव्हरी बॉयला अटक केली असून झोमॅटोनं त्याला कामावरुन देखील हटवलं आहे. या घटनेबद्दल कंपनीने या महिलेची माफी मागितली आहे. कंपनी आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करून पोलिसांना संपूर्ण सहाय्य करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आता त्या डिलिवरी बॉयची देखील बाजू समोर आली असून ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्यानं सबंधित महिलेने शिवीगाळ करत चप्पलनं मारहाण केल्याचा दावा डिलीव्हरी बॉयनं केला आहे.संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता.ऑर्डर पोहोचवण्यासाठी उशीर झाल्यानं त्याने त्या महिलेची माफी मागितली होती.ट्रॅफिक जास्त असल्यानं आणि रस्ता खराब असल्यानं पोहोचण्यास उशीर झाल्याचं त्याने सांगितलं.

महिलेनं पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता आणि त्या झोमॅटो चॅट सपोर्टशी बोलत होत्या.यानंतर महिलेने झोमॅटो सपोर्टशी बोलताना ऑर्डर रद्द केली. ऑर्डर रद्द केल्यानंतर ती परत देण्यास नकार दिला. यांनतर बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यावर मला त्या महिलेने चप्पलनं मारहाण केली आणि स्वत:च्या अंगठीनं नाकावर मारुन घेत जखम केली असा दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!