अकोला : शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउन जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल, दवाखाने, अॅम्ब्युलन्स सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत फक्त दूध व दुधजन्य प्रदार्थांची दुकाने सुरु राहतील. प्रवासी रिक्षा मध्ये दोन व्यक्ती आणि चारचाकीत चार व्यक्तींना परवानगी. त्यापेक्षा अधिक दिसल्यास करवाई होणार आहे
दरम्यान, अकोल्यात गुरुवारी दिवसभरात 435 रुग्ण आढळले होते. अकोल्यात सध्या 3798 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर अकोल्यात १९३२१ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी १५११९ रुग्ण बरे झाले. तर, ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू महापालिका क्षेत्रात झाले आहेत.
दुसरीकडे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांना शहरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून दारूचे दुकाने आणि हॉटेल पूर्णपणे बंद राहणार असून, दारू आणि जेवण यांची ऑनलाई विक्री सुरु राहनार आहे. तर २१ तारखेला कोरोनाची पुढची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल अस नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निर्बंध लावा मात्र लॉक डाऊन नको’ पुणे व्यापारी महासंघाच अजित पवारांना पत्र
- शहरातील ‘या’ प्रसिद्ध दुकानांना, हॉटेलचालकांना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दणका
- आज मिताली आणि विराट ब्रिगेड दिसणार मैदानावर
- यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील संपन्न, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढसंकल्प करूया – अजित पवार
- विनामास्क फिरणाऱ्या युवकाकडून मनपा कर्मचाऱ्याला मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
