Share

“अग्निपथ योजनेमागे संघाचा छुपा अजेंडा” ; नगमा यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लष्करातील सैन्यभरतीबाबतच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेवरून देशात सर्वत्र गदारोळ सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी सैन्य भरती अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. एका राज्याचे पडसाद दुसऱ्या राज्यातही उमटत आहेत. देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांकडून निदर्शने होत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या योजनेसंदर्भात अनेक लोकांनी आपापले मत मांडले आहे. अग्निपथ योजना ही आरएसएसचा अजेंडा आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी केला. त्यावरून आता अभिनेत्री नगमा (Nagma) यांनी ट्विट केलं आहे.

“अग्निपथ ही योजना RSS चा अजेंडा आहे? या योजनेतंर्गत भरती होणारे २५ टक्के तरुण आरएसएसशी संबंधित असतील. खतरनाक मनसूबे आहेत. माजी पंतप्रधानांचे सुपुत्र कर्नाटकचे कुमारस्वामी याविषयी सवाल उपस्थित करत आहेत. लष्कराचं नाजीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. त्या दिशेने हे सर्व सुरु आहे”, असं नगमा यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान अग्निपथ योजनेविरोधात अनेक आंदोलने होत आहेत. अहमदाबाद शहरामध्ये अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या १४ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशामधूनदेखील ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे पश्चिम बंगालमध्ये पूर्व रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!