🕒 1 min read
मुंबई : मान्सूनचे संपूर्ण महाराष्ट्रात आगमन झालेले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, कोकण, विदर्भासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा वेग थांबला होता. पण आता मान्सूनचा वेग महाराष्ट्रामध्ये वाढला आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस तर पश्चिम किनारपट्टी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. याशिवाय कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने हवामानाची माहिती घेतल्यानंतरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आणि पुण्याच्या डोंगराळ भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
9 am: 20 Jun,Something we were waiting for long…
Low Medium dense clouding over west coast including Mumbai Thane around and parts of madhya Mah, Vidarbha …
Its raining …????☔☔
कोकणात जोरदार ची शक्यता…पुणे ढगाळ आकाश, पावसाळी वातावरण …. pic.twitter.com/EDUGwxjShf— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2022
दरम्यान, आतापर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होत असतो पण यंदा तीन दिवस आधीच दाखल झाला होता. १ जूनपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही. १ जून ते १९ जून या कालावधीत राज्यात अपेक्षेपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे.
Orange alert for Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg, today: Regional Meteorological Centre, Mumbai
— ANI (@ANI) June 20, 2022
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
