Share

“आज कुणीजरी पावसात भिजलं तरी त्याचा काही परिणाम होणार नाही”; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीपुढे आपले सहाही उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी पडळकर यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीचे ५ हि उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीजरी पावसात भिजलं तरी त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटतं नाही, असं म्हणत पडळकरांनी अप्रत्यक्षपणे पवारांना टोला लगावला म्हणाले.

तसेच पुढे भाजप हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. २०१९ ला विश्वासघात झाला होता. जनतेच्या मतांच्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केल होत. परंतु आमदारांना आता पहिल्यांदा योग्य संधी मिळाली त्यांचं मत व्यक्त करायची आणि हे सर्व आमदार निश्चित व्यक्त होतील, असा विश्वास देखील पडळकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष आमदारांबाबत देखील वक्तव्य केलं आहे. राऊतांनी अपक्ष आमदारांची कितीवेळा अब्रू घालवली. ते लोकांच्यातून निवडून आलेले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. ज्या आमदारांना लोक निवडून देतायत. त्या लोकांच्यामध्ये या आमदारांविषयी मत कुलुशित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ते सगळे आमदार आज निश्चित व्यक्त होतील, असं पडळकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!