Share

ठाकरे सरकारच्या राज्यात महिला खरचं सुरक्षित आहेत का ?

Published On: 

पुणे, श्रुती मुंगीकर : ‘महिला अत्याचार’ ही समाजाला भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या सध्या आणखी फोफावत चालली आहे. दररोज थरकाप उडवणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे कुठे तरी सरकारचा या सगळ्यावर अंकुश आहे की नाही असा प्रश्न उपस्थित राहतो. तर कधी स्त्रियांसाठी कायदे बनवणारेच जेव्हा हे कायदे धाब्यावर बसवतात. त्यामुळे पिडीतांवर अत्याचार सहन करणे आणि सहन न झाल्यास स्वतःला संपवणे हाच मार्ग त्या अवलंबत असल्याच्या घटना दररोज घडतात म्हटलं तरी वावग ठरणार नाही. जेव्हा प्रश्न कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात महिला किती सुरक्षित आहेत हा येतो तेव्हा त्या काळात घडलेले अत्याचार आणि विशेषतः त्यावर योग्य न्याय मिळाला की नाही याचा आढावा घेतल्यास आपल्याला महिला सुरक्षिततेचा विषय किती गंभीर आहे याची कल्पना येते.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून महिला आत्याचारांच्या अनेक घटना घडल्या यामध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक असलेल्या या तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार 3 फेब्रुवारीला घडला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी तरुणाने केवळ संबंधित तरुणी आपल्याशी व्हाट्सएप्प वर बोलत नसल्याने त्याने हे दुष्कृत्य केल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणावर न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र अद्याप देखील या तरुणीला न्याय मिळालेला नाही.

हिंगणघाट येथील प्रकरण ताजे असताना एका नराधमाने महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूर घडली होती. संबंधित डॉक्टर महिला मंदिरात जात असताना आरोपीने तिच्या अंगावर ऍसिड हल्ला केला होता. यावेळी आरोपी निलेश तिच्याजवळ आला आणि तुझा चेहरा खराब करतो, असे म्हणत त्याने तिच्या अंगावर ऍसि़ड हल्ला केला होता.

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात याच काळात एक घटना समोर आली होती. यामध्ये घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं आहे. तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेनं अखेरचा श्वास घेतला होता. या प्रकरणात एका आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली होती.

राजकीय नेत्यांवर झालेले महिला अत्याचाराचे आरोप:

वरील घटनांमध्ये संबंधित आरोपी निदान राजकीय पार्श्वभूमी असलेले नव्हते मात्र नुकत्याच चर्चेत असलेल्या करुणा शर्मा , रेणू शर्मा प्रकरणात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तर नुकतच बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर आघाडी सरकारमधील आणखी एका कथित मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहेत. तर यामध्ये संबंधित तरुणीची आत्महत्या विषयीच्या ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाले आहेत.

मुंढे – शर्मा प्रकरण –
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पीडित रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर स्पष्टीकरण दिलं होते. यामध्ये आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं होत. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर यावेळी या प्रकरणानंतर उठलेल्या राजकीय वादळानंतर संबंधित तरुणीने आपली तक्रार मागे देखील घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला मात्र थेट मंत्र्यांवर आरोप होत असलेलं आणखी प्रकरण अनिर्णित राहील.

पूजा चव्हाण प्रकरण –
परळी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. मात्र या प्रकरणात देखील विरोधकांकडून वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले जात आहे तर सरकारमधील इतरांकडून त्यांची पाठराखण देखील केल्याचे दिसून येत आहे.

शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक-२०२० संयुक्त समितीच्या बैठकीत राज्यात नव्याने लवकरच शक्ती कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २१ दिवसात शिक्षा मिळणार आहे. तसेच एखाद्या महिलेने अत्याचाराची खोटी तक्रार दिल्यास तिच्यावर देखील कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. शक्ती कायदा अस्तित्वात आल्यानंतर महिलेने तक्रार दिल्यावर २१ दिवसांत तपास पुर्ण करून दोषारोपपत्र पोलिसांना दाखल करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील ३० दिवसात न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण होवून आरोपीला शिक्षा व्हावी अशी तरतुद या कायद्यात करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल  देशमुख यांनी सांगितले.

मात्र कायदे कितीही कठोर असले तरी गुन्हेगार सुटतात कसे हा एक मोठा प्रश्न प्रत्येक महिला अत्याचाराच्या प्रकरणानंतर आ वासून तसाच उभा राहिलेला असतो. हेच खरे मग कधी तिच्या आत्महत्येने, कधी तिच्या तक्रार मागे घेण्याने, तर कधी तिच्या निशब्द करणाऱ्या हत्येने. कारण; भय आणि तिचं अस्तित्व यांचं नेहमीच एक समीकरण असत जसं पुढील कवितेत म्हटल आहे.
         भी ‘ती’

भी ‘ती’ या शब्दातच ‘ती’ च आणि ‘भयाच’ समीकरण झालं…..
त्यानंतर सुरूच झाली ‘ती’ च्या भी ‘ती’ ची मालिका…..
जन्मताच ‘ नकोशी ‘ होण्याची भी ‘ती’
समाजात वावरताना ‘ निर्भया ‘ होण्याची भी ‘ती’
कर्तृत्व सिद्ध करताना अस्तित्व राखण्याची भी ‘ती’
बिनधास्त वावरताना चारित्र्य जपण्याची भी ‘ती’
नकार देताना कधी अॅसिड तर कधी पेट्रोल हल्ल्याची भी ‘ती’
पुरुषार्थ गजवताना ‘ स्त्रीत्व ‘ जपण्याची भी ‘ती’
एक भूमिका बजावताना अनेक भुमिका पेलण्याची भी ‘ती’
नवनिर्मिती होताना जनन आणि मरण यातनांची भी ‘ती’
असंख्य अशा भी ‘ती’ अन् मर्यादांच्या भिं ‘ती’ ही…

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!