Share

‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव’ हीच सरकारची भूमिका; भाजपचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. आता यावरच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आघाडी सरकारची भूमिका, “मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव” (एसटी कर्मचारी हे देवच आहेत) असे खोचक ट्वीट प्रसाद लाड यांनी केले आहे. या ट्वीट मधून आंदोलक एसटी कर्मचारी यांच्याबाबत त्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.

दरम्यान मागील चार दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर हे सुद्धा सहभागी झाले असून दोन दिवसांपासून ते तीथेच मुक्कामी आहेत. आज सकाळीच सदाभाऊ खोत यांनी दिवसाची सुरुवात योगासनाने केली. यावेळी त्यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांनीही योगासने केली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!