अहमदनगर : सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच चिघळत चालले आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पाथर्डीमध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी बोलत असतांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी बोलत असतांना पंकजा म्हणाल्या की,’सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, ‘पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली ते माहित नाही, परंतु राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. सत्तेत बसलेले पक्ष आमच्यावर आरोप करत आहेत. या सर्व गोंधळामध्ये राज्याचा विकास मागे पडला असून, नको ते विषय समोर येत आहेत. विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जर विकासावर भर दिला तर अधिक चांगले होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
- सुसाइड नोट लिहून काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

