🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने सभापती पद मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काहींनी सभापती पदाची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने भाजपच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपातील अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनीही पुन्हा एकदा सभापती पदावर दावा केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ घेऊन भाजपचा सभापती करण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे. मात्र याउलट दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन नगरसेवकांनी सभापती पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी सभापती पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी आमदार संग्राम जगताप यांची नगरसेवकांसमवेत बैठक झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास भाजपची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप काय भूमिका घेतात याकडे अहमदनगर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कालपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू; ‘एनडीआरएफ’च्या पाच तुकड्या तैनात
- ‘पवारसाहेब खेळाडूंच भलं केलंत, आता शेतकऱ्यांचंही करा!’
- सरकार बदल्या, टेंडर वाटपात गुंग! आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर बोचरी टीका
- मराठा आरक्षण आणि पोलिस भरती संदर्भातील मागण्यांसाठी मराठा समाजाचे संगमनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन
- #मराठा_आरक्षण : खा. संभाजीराजेंनी मागितली मोदींच्या भेटीची वेळ, मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
