Share

मराठा आरक्षण आणि पोलिस भरती संदर्भातील मागण्यांसाठी मराठा समाजाचे संगमनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

संगमनेर : न्यायालयाकडुन मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे तर संगमनेरमध्येही सकल मराठा समाजाकडुन आपल्या मागण्यांसाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करुन संगमनेर शहरातुन जाणारा पुणे-नाशिक हायवे मार्ग अडवण्यात आला होता.

दरम्यान, पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली जे की मराठा समाजाला चेतवुन जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. ‘मराठा आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय जो पर्यंत होत नाही तो पर्यंत हि पोलीस भरती स्थगित करावी’ अशीही मागणी आंदोलकांकडून सातत्याने होत आहे. शहरात आंदोलक कर्त्यांकडुन मोठी घोषणाबाजीही करण्यात आली आणि मोर्चा देखील काढण्यात आला.

या आंदोलनात मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले तसेच यावेळी कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या आंदोलना मध्ये सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!