मुंबई : राज्यात परतीच्या पावसाच्या हंगामाला सुरुवात झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबई, पुण्यासह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे.
दरम्यान, कालपासून जोर धरलेल्या पावसामुळे पुन्हा मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून आले आहे. प्रमुख रस्त्यांसह वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरले असून पालकमंत्री अस्लम शेख यांनी १०० टक्क्यांहुन अधिक यशस्वी नालेसफाईचा दावा देखील याच पाण्यात वाहून गेलेला यावर्षी दिसून आले. तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले असून हाती येणार उभं पीक वाहून गेलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन, निर्यात बंदी अशा संकटांना सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिकूल स्थितीमध्ये भर पडत असून सरकार दरबारी याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजप नेत्यांनी मुंबई महापालिकेसह राज्य सरकारवर या मुद्द्यावरून वेळोवेळी निशाणा साधण्यात आला आहे. आता पुन्हा पावसाच्या रौद्ररूपामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईतील स्थितीवरून भाजपचे नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.
” विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!” असे ट्विट करत आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो!
सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ??
शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 23, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- आरक्षणाचा वाद पेटला! मराठा विरुद्ध ओबीसी मंत्र्यांमध्येच मतभेद?
- कृपा करा… आता तरी चित्रीकरणावर बंदी घाला; ज्येष्ठ अभिनेत्याची विनवणी
- ‘पवारसाहेब खेळाडूंच भलं केलंत, आता शेतकऱ्यांचंही करा!’
- कालपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू; ‘एनडीआरएफ’च्या पाच तुकड्या तैनात
- ‘पवारसाहेब खेळाडूंच भलं केलंत, आता शेतकऱ्यांचंही करा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

