Share

#मराठा_आरक्षण : खा. संभाजीराजेंनी मागितली मोदींच्या भेटीची वेळ, मात्र…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राज्यात आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर, दुसरीकडं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात यावा यासाठी धनगर समाजाने देखील राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाला समाजातील नागरिकांसह अनेक लोकप्रतिनधींचा देखील पाठिंबा मिळत आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र यावे यासाठी आवाहन केले होते.

संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास वीसपेक्षा अधिक खासदारांनी संभाजीराजेंची भेट घेऊन समर्थनाचे पत्र सोपवले होते. यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी निवेदन देणार असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून अजून कोणताही प्रतिसाद आल्या नसल्याचे खासदार संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यात आणि केंद्रात सर्वांना सोबत घेऊन माझे प्रयत्न सुरूच राहतील असे खासदार संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!