Share

‘पवारसाहेब खेळाडूंच भलं केलंत, आता शेतकऱ्यांचंही करा!’

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने ही विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार मात्र अनुपस्थित होते. काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. विधेयक हे शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत त्यांनी विरोध दर्शवला आहे. यावर, राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

” शरद पवारांनी क्रिकेट क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. खेळाडूंना फक्त भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एकदिवसीय व कसोटी सामने खेळता यायचे. पवार साहेबांनी आयपीएल सुरु केलं आणि खेळाडूंचे लिलाव होऊन त्यांना पैसे चांगले मिळू लागले. तसंच शेतकऱ्यांना फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्याचं बंधन आणलं तर त्यांच देखील शोषण होत. त्यामुळे मोदी सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर देखील कृषी माल विकण्याची मोकळीक दिली आहे.” असे अनिल बोंडे म्हणाले.

शरद पवारांचा कृषीविधेयकाला छुपा पाठिंबा?

अनिल बोंडे म्हणाले, ” पवारांनी या विधेयकाच समर्थन करायला हवं. ज्याप्रमाणे खेळाडूंचं भलं केलं तसंच शेतकऱ्यांचं देखील भलं झालं पाहिजे त्यामुळे पवार मनामधून तर या विधेयकाच्या बाजूने आहेत. कारण जर विरोध असता तर त्यांनी राज्यसभेत कणखरपणे विरोध केला असता. त्यामुळे खेळाडूंसाठी आयपीएलला जसं समर्थन केलं तसेच या विधेयकाला त्यांनी समर्थन करावं” अशी मागणी देखील त्यांनी शरद पवारांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!